परभणी, (प्रतिनिधी) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजनेसाठी दि. 07 जुलै, २०२६ ते दि. 22 जुलै २०२६ या कालावधीत प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे यांनी केले.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना या उपक्रमांतर्गत दैनंदिन दिनचर्यामध्ये फिटनेसचा समावेश करण्याच्या उद्देशाने लठ्ठपणाशी लढण्यासाठी, आपल्या तंदुरुस्तीच्या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणुन संतुलीत शारीरिक व्यायाम आणि हालचाली करणे अत्यावश्यक आहे. निरोगी राष्ट्राच्या उभारणीत नियमित शारीरिक व्यायाम आणि खेळांचे महत्व नागरिकांमध्ये रुजावे याकरीता हे दोन महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
क्रीडागंण विकास अनुदान योजना व व्यायामशाळा विकास अनुदान योजनाचे प्रस्ताव दि. 22 जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करण्यात यावे अधिक माहिती करीता सुयश नाटकर (क्रीडा अधिकारी) ९७६३९९४८४६ – (व्यायामशाळा विकास योजना) आणि रोहन औंढेकर (क्रीडा अधिकारी) – ८९९९३३७९२९ (क्रीडागंण विकास योजना) यांच्याशी संपर्क साधावा.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत, शासकीय संस्था व शैक्षणीक संस्था ज्या पाच वर्षापुर्वी १०० टक्के अनुदानीत आहेत अशानाच अनुदानास पात्र असतील, असे श्रीमती साखरे यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*


