परभणी,प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 64 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत परभणीच्या दोन संस्थांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याच्या रंगभूमीचा गौरव वाढविला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात राजीव गांधी युवा फोरम आणि क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टच्या कलावंत व तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला.
राजीव गांधी युवा फोरम, परभणी निर्मित ‘संपूर्ण’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावत स्पर्धेत आपला ठसा उमटविला. या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक विजय करभाजन असून निर्माते संजय पांडे आहेत. नाटकासाठी विजय करभाजन यांना प्रथम दिग्दर्शन पारितोषिक प्राप्त झाले. तसेच किशोर पुराणिक आणि डॉ. अर्चना चिक्षे यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदकासह प्रथम पारितोषिक मिळाले, तर अनिल पांडे यांना प्रकाश योजनासाठी तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.
‘संपूर्ण’ नाटकात किशोर पुराणिक आणि डॉ. अर्चना चिक्षे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. नेपथ्याची जबाबदारी स्नेहल पुराणिक व ऐश्वर्या पुराणिक यांनी, रंगभूषा व वेशभूषेची जबाबदारी संतोष चिक्षे व सरोज पांडे यांनी, संगीताची जबाबदारी दिनेश नरवाडे व अनिल पांडे यांनी, प्रकाश योजनेची जबाबदारी नारायण त्यारे व आदित्य पांडे यांनी, तर रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी श्रीपाद कासराळीकर, प्रभाकर जोशी आणि मंगल जोशी यांनी सांभाळली.
क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट, परभणी निर्मित ‘ते दिवस’ या नाटकालाही विविध तांत्रिक विभागांमध्ये यश मिळाले. नाटकाचे लेखक विजय करभाजन, दिग्दर्शक सुनिता करभाजन आणि निर्माते प्रसाद बालनाथ देशपांडे आहेत. या नाटकासाठी किशोर पुराणिक यांना नेपथ्य विभागात तृतीय, रेवती पांडे यांना रंगभूषेसाठी द्वितीय, रेणुका अंबेकर यांना वेशभूषेसाठी द्वितीय आणि त्र्यंबक वडसकर यांना संगीत दिग्दर्शनासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच सई चिटणीस यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
‘ते दिवस’ या नाटकात प्रेम शिंदे, भाग्यश्री गायकवाड, रवि पुराणिक, ज्योती जोशी, सुहास बिडकर, विजय करभाजन, भानुदास जोशी, सई चिटणीस, श्रावणी कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी आणि नागेश कुलकर्णी यांनी विविध भूमिका साकारल्या. नेपथ्याची जबाबदारी किशोर पुराणिक व बालाजी दामुके, रंगभूषेची जबाबदारी रेवती पांडे, वेशभूषेची जबाबदारी रेणुका अंबेकर, संगीताची जबाबदारी त्र्यंबक वडसकर व श्रद्धा वडसकर, प्रकाश योजनेची जबाबदारी नारायण त्यारे व शौनक पांडे, तर रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी अरविंद शहाणे, दिनकर जोशी, बाळू साखरेकर आणि राजलक्ष्मी देशपांडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
या दोन्ही नाटकांच्या यशामुळे परभणीच्या हौशी रंगभूमीला नवी उभारी मिळाली असून जिल्ह्यातील रंगकर्मी, साहित्यिक आणि नाट्यरसिकांकडून सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. परभणीच्या कलावंतांनी राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


