परभणी,प्रतिनिधी) : शहरातील मातोश्री नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 93 हजार 423 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनराव बापुराव कदम (वय 74, रा. मातोश्री नगर, परभणी) हे आपल्या मुलगी सोनाली कदम यांच्यासह 1 जुलै रोजी घराला कुलूप लावून सातारा येथे मुलाखतीसाठी गेले होते. त्यानंतर ते पुणे येथे मुलाकडे मुक्कामी राहिले. 6 जुलै रोजी सकाळी किशनराव कदम हे परभणीतील घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याचे दागिने तसेच दुसर्या कपाटातील रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या ऐवजात 27.610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 6.960 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस, 2.860 ग्रॅम वजनाचे मणी मंगळसूत्र, पाच रुपयांची 500 नाणी आणि 500 रुपयांच्या सात नोटांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत 93 हजार 423 रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले.
1 जुलै ते 6 जुलै या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Thursday, August 27
ताज्या बातम्या:
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा


