परभणी,(प्रतिनिधी) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी (एमसीवाय) वाहनांसाठी लवकरच एमएच-22-बीएम ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. तरी इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांच्या नावे कार्यालयात दि. 10 ते 13 जुलै 2026 या कालावधीत दुपारी 2.30 पर्यंत खिडकी क्र. 11 सहा. रोखपाल यांच्याकडे जमा करावेत असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
नविन नोंदणी वितरकांच्या स्तरावर होत असल्यामुळे लिलाव दिनांकात व सिरीज सुरु करण्याच्या दिनांकात बदल करण्याचे पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे राहील. एका पसंती क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासच लिलाव घेण्यात येईल. या बाबत सूचना केवळ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येतील, तरी जास्तीत-जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावे, असे त्यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*


