परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर महिला मोर्चाच्या वतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त “देवा भाऊ कृषी माऊली सोहळा” आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत परभणी शहरातील रामकृष्ण नगर येथे १५० शहरी महिलांना बागकाम व भाजीपाला लागवडीसाठी कृषी किटचे मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेत्या डॉ. मीनाताई परतानी या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीभाऊ भरोसे, शहर जिल्हा महामंत्री श्री. भालचंद्रजी गोरे, लताताई वाकळे, सौ. मीनाताई वडपुरकर, सौ. तिरुमला खिलारे, नगरसेविका सौ. सुशीलाताई थोरात, नगरसेविका सौ. सपनाताई जुक्टे, सौ. गिरीजा अजेगावकर, डॉ. मंजुषा नरवाडकर, सीमाताई धुमाळ, सौ. प्रभावती अन्नपूर्णे, सौ. विजयाताई कातकडे, रोहिणीताई हलगे, प्रा. रमाताई शेजावळे, प्रा. ऋतुजा जोशी, सौ. रुपाली ठाकरे, डॉ. नम्रता पाटील, सौ. बालिका सुरनार, सौ. सुलभा धुळे, सौ. अपर्णा जोशी, सौ. छायाताई मोगले तसेच ज्येष्ठ नागरिक सुधाकर काका डावरे व सौ. वर्षाली सुधाकर डावरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजिका तथा प्रभारी, मनपाच्या माजी गटनेत्या मंगलताई मुदगलकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा जोशी यांनी केले, तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मनीषाताई जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी शहर जिल्हा महामंत्री भालचंद्रजी गोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महिला शेतकरी व गृहिणींना आधुनिक शेतीचे ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शाश्वत शेतीची दिशा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, शहरातील महिलांना घरच्या घरी भाजीपाला व फळझाडांची लागवड करण्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल.
कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे निवृत्त हॉर्टिकल्चर अधिकारी सुधाकर काका डावरे यांनी फळझाडे, भाजीपाला व विविध फुलझाडांची लागवड, मातीची योग्य तयारी, पालापाचोळ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची पद्धत याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या निवासस्थानी विकसित केलेल्या बागेची पाहणी करून महिलांना उपलब्ध जागेत भाजीपाला व फळझाडांची लागवड करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली ठाकरे, अपर्णा जोशी, सीमाताई धुमाळ, छायाताई मोगले, दीपाली वाघ, अर्चना जैन, उषा चव्हाण, प्रियांका चव्हाण, उषा पाटोळे, कीर्ती सिरसागर, सुनीता घुगे, रेखा पाईकराव, पूजा मोरे, मंगल वाघमारे तसेच महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


