परभणी, (प्रतिनिधी): मोची कॉलनी, परभणी येथील जयराम बन्सीलाल कुरील यांची मुलगी सुहानी जयराम कुरील (वय 21 वर्ष, मोची गल्ली परभणी) ही दि. 23 जुलै, 2026 रोजी रात्री 03.00 वाजता कोणास काही न सांगता घरातून निघून गेली असून नंतर घरी परत आली नाही.
याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सदरील तरूणीचा रंग गोरा, चेहरा गोल लांबट, उंची 5 फुट, बांधा सडपातळ, अंगात ग्रे कलरचा टॉप व ग्रे कलरची पॅन्ट, डोळे काळे, व भाषा मराठी अवगत आहे.
बेपत्ता झालेली तरुणी कुणाला आढळून आल्यास तपासीक पोलीस निरीक्षक गणेश कदम (मो. ९४२३९१०९०२) फोन क्र. (02452-220450) नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन तपासीक अमंलदार एस. चव्हाण यांनी केले आहे.
*-*-*-*-


