परभणी(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अमित शाह युवा संघटनेची स्थापना करण्यात आली असून या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी येथील व्यापारी प्रकाश सूरजमल लाखरा यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अमित शाह युवा संघटनेची स्थापना जनसेवा व हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व युवकांना देशाच्या उज्वल भविष्यासाठी विविधतेत एकता निर्माण करून देशसेवेचे धडे देण्यासाठी युवकांना एकत्र करून राष्ट्राचा विकास करण्यासाठी ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी देवगिरी प्रांताचे आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री प्रकाश लाखरा हे अमित शाह युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मितेश शाह यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच मागील 25 वर्षांपासून हिंदू समाजाच्या विविध कार्यात पुढाकार घेऊन उत्तम कार्य करत असल्यामुळे परभणी जिल्ह्यातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लाखरा यांना संघटनेचे उपाध्यक्ष अतुल विश्वकर्मा यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. प्रकाश लाखरा यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


