परभणी,(प्रतिनिधी) : रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधांच्या कामांमुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून धावणार्या काही विशेष गाड्या आणि एक्स्प्रेसच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. गुंटकल विभागातील रेनिगुंटा यार्डच्या पुनर्रचनेसह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्याचे काम तसेच चक्रधरपूर विभागातील झारसुगुडा स्थानकाच्या प्रवासी यार्डच्या पुनर्रचनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेनिगुंटा यार्डमधील कामांमुळे गाडी क्रमांक 07603 नांदेड-तिरुचानूर विशेष गाडी 15 आणि 22 डिसेंबर 2026 रोजी, तर गाडी क्रमांक 07604 तिरुचानूर-नांदेड विशेष गाडी 16 आणि 23 डिसेंबर रोजी रद्द राहणार आहे. तसेच गाडी क्रमांक 07814 जालना-तिरुपती विशेष गाडी 12 नोव्हेंबर 2026 रोजी आणि गाडी क्रमांक 07815 तिरुपती-जालना विशेष गाडी 13 नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय गाडी क्रमांक 17637 जालना-तिरुचानूर गाडी 14 आणि 21 डिसेंबर 2026 रोजी, तर गाडी क्रमांक 17638 तिरुचानूर-जालना गाडी 15 आणि 22 डिसेंबर रोजी धावणार नाही.
दरम्यान, झारसुगुडा स्थानकातील प्रवासी यार्डच्या पुनर्रचनेच्या कामामुळे गाडी क्रमांक 12767 नांदेड-संतरागाछी एक्स्प्रेसच्या 23 आणि 30 नोव्हेंबर, 7, 14, 21 आणि 28 डिसेंबर 2026 तसेच 4 आणि 11 जानेवारी 2027 या तारखांच्या एकूण आठ फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 12768 संतरागाछी-नांदेड एक्स्प्रेसच्या 25 नोव्हेंबर, 2, 9, 16, 23 आणि 30 डिसेंबर 2026 तसेच 6 आणि 13 जानेवारी 2027 या तारखांच्या एकूण आठ फेर्या रद्द राहणार आहेत.
प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
Friday, October 16
ताज्या बातम्या:
- राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांचे भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी केले स्वागत
- परभणी जिल्ह्यातील ५२ ऐतिहासिक वारसा स्थळांच्या प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते उद्घाटन
- कलाम स्ट्रीम चॅलेंजमध्ये श्री शिवाजी अभियांत्रिकीची बाजी ४० विद्यार्थ्यांची इस्रो भेटीसाठी निवड; परभणीच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव
- १२ हजारांचे शिक्षण शुल्क थेट २० हजारांवर; शुल्कवाढ रद्द करण्यासाठी अभाविप आक्रमक
- टाकळी येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची केली पाहणी
- पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचे काटेकोर पालन करा; अपर विभागीय आयुक्त डॉ. प्रताप काळे
- मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबर मुदत
- शिरकळस येथे धान्य संकलन व विक्री केंद्राचे उद्घाटन उत्साहात संपन्न- महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मिळणार चालना


