परभणी ( प्रतिनिधी)
आरोग्य परिचारीका, जिल्हा परिषद परभणी मार्फत अंतिम यादी व नियुक्ती करून घेण्यात येत नव्हती म्हणून आज
भारतीय विद्यार्थी मोर्चा व बहुजन मुक्ती’ पार्टी परभणी मार्फत बेमुदत धरणे आंदोलन करण्यासाठी आज दि 07.10. 2024 बसणार होते. परंतु जिल्हा परिषद प्रशाशनाने त्यांचे मागणी ची
दखल घेवून आज अंतिम निवड यादी जाहीर केली. व
सर्व अरोग्य परिचारिका यांची निवडीची प्रक्रिया आज पासुन पुर्ण करून घेण्यात येत असुन त्यांना प्रक्रिया पूर्ण करून घेऊन रुजू करून घेण्याचा आदेश त्वरीत देण्यात येईल’.
यावेळी जिल्हा परिषद परभणी चे अरोग्य अधिकारी मा. गिते साहेब यांनी भारतीय विद्यार्थी मोर्चा व बहुजन मुक्ती
पार्टीच्या पदाधिकारी व सर्व अरोग्य परिचारीका यांच्याशी
चर्चा करून सदरील आंदोलन थांबविण्यास सांगीतले
यावेळी सर्व पदाधिकारी व आरोग्य परिचारीका उमेदवार महिला यांनी मा. गिते साहेबांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन व आभार व्यक्त केले.
यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हा प्रभारी,
मा. संदेश वाघमारे, बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा प्रभारी
मा. गौतम जडे, लोकसभा अध्यक्ष- अँड विनोद अंभोरे,
जिल्हा अध्यक्ष – सुभाष साडेगांवकर, बहुजन क्रांती मोर्चा चे संयोजक : रविकुमार नरवाडे, भारत लांडगे, सटवाजी नखाते, संजय सोनकांबळे, ॲड. अब्दुल कदीर, अँड. कांचन बनसोडे ई. उपस्थित होते.