परभणी – राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ,नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधुन परभणीत येत्या 11ऑक्टोबंर 2024 शुक्रवार रोजी आयोजित राज्यस्तरीय परभणी मॅराथॉन स्पर्धेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी ५ वाजता वा. उत्साहात संपन्न झाले..
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष *डाॅ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे* यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे व उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या प्रमुख उपस्थितीत या संपर्क कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमास सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रणजित काकडे यांनी केले. स्पर्धेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडुसह जवळपास १ हजार स्पर्धक सहभागी होतील.
३ ,६ व १० कि.मी. अंतराच्या या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या दहा क्रमांकाच्या विजयी खेळाडुंना एकुण दोन लक्ष रुपयाची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत शहरातील विविध रस्त्यावरुन ही स्पर्धा धावणार आहे.
महाराष्ट्र अथलॅटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशन च्या मान्यतेने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रोख पारितोषिकाच्या व्यतिरिक्त प्रत्येक गटातील पहिल्या १० क्रमांकांच्या खेळाडुंना कीट बॅग व मेडल देण्यात येतील.याशिवाय सर्व सहभागी स्पर्धेकांना ऑनलाईन प्रमाणपत्र दिले जातील.दिनांक ८ /१०/२०२४ पासुन वसमत रोडवरील राज गोपालाचारी उद्यानासमोरील संपर्क कार्यालयात सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत खेळाडुंना आपली नाव नोदणी करता येईल.
या मॅराथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा , असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस कमिटी अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष तथा स्पर्धा आयोजक *डाॅ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे* यांनी केले आहे.