सेलू ( प्रतिनिधी) श्रीराम प्रतिष्ठान येथे आई महोत्सवा निमित्त डॉ. संजय दादा रोडगे मित्र मंडळाच्या वतीने रवळगाव जिल्हा परिषद सर्कल मधील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण भागातील महिला भगिनींना रेणुका मातेचा दर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून आज मौजे बरसाले डिग्रस येथील माता भगिनींना मंठा येथील सर्वांचे आराध्य दैवत रेणुका माता दर्शनाचा लाभ डिग्रस येथील माता भगिनींनी घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविता रोडगे, डॉ. अपूर्वा रोडगे- पारवे, प्रकाश गजमल, श्सजय गटकळ, लाटे, विश्वनाथ गजमल, श्आबासाहेब तारडे ,बद्री बरसाले, योगेश बरसाले, ज्ञानेश्वर बरसाले, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे त्याचबरोबर डिग्रस येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दिगंबर टाके यांनी केले तर आभार श्री. श्याम शेळके यांनी मानले.