परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी (दि.07) येथील श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय शालेय अॅथलेटीक्स स्पर्धे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
14,17,19 या वयोगटात झालेल्या स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे व प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव हे होते. याप्रसंगी महापालिकेचे नगरसचिव विकास रत्नपारखे, प्रा. महेशकुमार काळदाते, प्रा. राजु रेंगे, डॉ. अनिल मेड. मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, सुशील देशमुख, बालाजी मनोलीकर, आदित्य गायकवाड, यमनाजी भाळशंकर, कैलास टेहरे, क्रीडा शिक्षक अनिल तडवी, रवि धोतरे आदींची उपस्थिती होती.
यावेळी धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, उंचउडी या स्पर्धा पार पडल्या. या सर्वच स्पर्धेत सारंगस्वामी विद्यालय, सेंट ऑगस्टिन इंग्लिस्कुल, क्विन्स अकॅडमी स्कुल, बालविद्या विहार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता पांडुरंग दुधाटे, कैलास काकडे, सय्यद सादेक यांनी परिश्रम घेतले.