पालम (प्रतिनिधी) येथील सिरस्कर गल्ली येथे रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय रूग्णालय पूर्णा व सार्वजनिक दुर्गा महोत्सव पालम यांच्या संयुक्त विद्यमानाने विनामूल्ये सामुदायिक आरोग्य शिबीर राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष ग्रह/विधी व न्याय विभागामार्फत जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले असून परभणी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ पैठणे यांनी पूर्णा येथील रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय धर्मादाय रुग्णालय व सार्वजनिक दुर्गा देवी नवरात्र महोत्सव पालम यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे
शिबिरासाठी श्री.बळीराजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भाई गोळेगावकर मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले त्याचबरोबर कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद लंगोटे, प्रशासकीय अधिकारी अभय कुमार कदम यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. सचिन लोणे, डॉ. सूर्यकांत काळे, डॉ. नेहा अभय कुमार कदम, डॉ. महेश कोकाटे, डॉ. विनोद सिरस्कर, डॉ. बोरगावकर व कर्मचारी नर्स, महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ने सहभाग घेतला पुढील शिबिराचे नियोजन योग्यरीत्या पार पाडत आहेत या शिबिरासाठी जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक डॉक्टर सिद्धार्थ पैठणे यांनी जिल्हा शिबिराचे योग्य मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक दुर्गादेवी नवरात्र चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.