परभणी (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन, परभणी जिल्हयात मागील आठवडयात विशेष मोहीमे अंतर्गत रु. ३,४८,२९० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर या विभागा मार्फत निरीक्षक राज्य उत्पादन परभणी विभागाचे निरीक्षक सु अ. चव्हाण व निरीक्षक .ए. एम. पठाण यांच्या नेतृत्वात चार पथके तयार करुन परभणी जिल्हयात विशेषत: पाथरी शहरात पारधीवाडा, इंदिरानगर, पाटील गल्ली (बाबुलतारा रोड), लहुजीनगर, रामपुरी, मानवत तालुका येथे हातभट्टी निर्मीती व विक्री केंद्रावर, अवैध दारु व वाहतुक बाबत एकुण २१ गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत व आरोपींन विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे, सदर कारवाईत २० आरोपीकडुन गुळ मिश्रीत रसायण एकुण ३१५० लिटर, १२२ लिटर हातभट्टी दारु, व ५८ लिटर देशी दारु, तीन दुचाकी व इतर साहीत्य असा एकुण ३,४८,२४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंर्तगत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. परभणी जिल्हयात आर्दश आचारसहींता लागु असल्यामुळे त्याचा भंग होऊ नये म्हणुन तसेच अवैध मद्य विक्रीतुन निवडणुक प्रक्रीयेवर परीणाम होऊ नये यासाठी कडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत करण्यात येत आहे.
ही कार्यवाही डॉ. विजयकुमार सुर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क म.रा. मुंबई, प्रसाद सुर्वे संचालक विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नांदेड डॉ. बि. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे, तसेच मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क परभणी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान,सदर कार्यवाही पथक प्रमुख निरीक्षक . सु. अ. चव्हाण, निरीक्षक परभणी, ए.एम. पठाण निरीक्षक(पथक प्रमुख) यांच्यासह निरीक्षक एम.एस. पतंगे निरीक्षक रा.ऊ. शु. गंगाखेड, एन. एन. निलमवार दुय्यम निरीक्षक रा.ऊ.शु. गंगाखेड यांच्या समन्वायाने आर. एम. डमरे दुय्यम निरीक्षक गंगाखेड, बी.के. गंगावणे दुय्यम निरीक्षक गंगाखेड,. एच एम पाकलवाड दुय्यम निरीक्षक परभणी, व्हि व्हि फुलारी दुय्यम निरीक्षक परभणी, ओ.बी. केंद्रे दुय्यम निरीक्षक परभणी, ए. बी जाधव दुय्यम निरीक्षक भरारी पथक परभणी,. बी.एल. ओहाळ दुय्यम निरीक्षक भप परभणी, तसेच जवान वर्ग सर्व. राहुल बोईनवाड, ऋषीकेश साळवे, विजय टेकाळे, भिमेश्वर पुपोलवार, बालाजी कच्छवे, राहुल शेळके, राम सुर्यवंशी, करण सातपुते, सुनिल चव्हाण, रवि सावंत, संदीप डहाळे, तुषार राठोड महीला जवान ऐश्वर्या चौधरी, वैष्णवी सोळंके यांनी कारवाई केली.
सराईत गुन्हेगार यांच्या विरुध्द फैजदारी प्रक्रीया संहीता कलम १६८ प्रमाणे एकुण १३३ नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.तसेच विधानसभा सर्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हयातील एकुण दोन मद्यार्क निर्मीती घटक व एकुण ७ ठोक विक्री देशी दारु अनुज्ञप्ती वर सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामार्फत नजर ठेवली जात आहे. तसेच किरकोळ विक्री अनुज्ञप्तीच्या दैनंदिन मद्य विक्री वर राज्य उत्पादन शुल्क परभणी विभागाचे सर्व अधीकारी लक्ष ठेऊन आहेत.परभणी जिल्हयात दिनांक २० रोजी मतदान होणार असुन परभणी जिल्यातील सर्व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती दिनांक १८ रोजी सोमवार सायंकाळी ६ वाजेपासुन मतदान दिनांक २० रोजी पुर्ण दिवस मतदान प्रक्रीया संपेपर्यंत असे एकुण तीन दिवस कोरडा दिवस घोषीत करण्यात आले आहेत. तसेच मतमोजणीचा दिवस दिनांक २३ रोजी शनिवार रोजी देखील कोरडा दिवस घोषीत करण्यात आला आहे.
कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच परभणी जिल्हयात अवैद्य मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगुन असेल किंवा विक्री करीत असेल तर याची खबर या विभागास देण्यात यावी. या विभागाचा टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटस अप क्र.८४२२००११३३ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.अशी माहीती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी यांनी दिली.


