परभणी,(प्रतिनिधी) : परभणी विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.10) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) आणि व्हीव्हीपॅट (मतदार पडताळणी पर्ची यंत्र) मशीनच्या पेअरिंगची प्रक्रिया पार पडली. त्यानिमित्त सकाळी 11.20 वाजता स्ट्राँग रूमचे सील उमेदवारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी परभणी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार अनिकेत पालेपवाड, मास्टर ट्रेनर सुभाष काचगुंडे आणि परभणी महानगरपालिका सहआयुक्त प्रज्ञावंत कांबळे हे उपस्थित होते. मतदारसंघात लढणार्या उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनी देखील या प्रक्रियेची साक्ष दिली.
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन पेअरिंगची ही प्रक्रिया म्हणजे निवडणुकीत वापरण्यात येणार्या मतदान यंत्रे आणि मतदार पडताळणी यंत्रांची कार्यक्षमता तपासण्याची एक महत्वाची पायरी आहे. यामधून मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा आणि मतदारांचा विश्वास दृढ करण्याचा उद्देश आहे. या प्रक्रियेत मतदान यंत्र व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करून घेतली जाते, जेणेकरून मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. 20 नोव्हेंबर रोजी होणार्या मतदानादरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे राबवण्यात येणार आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


