परभणी (प्रतिनिधी) शहरातील कलावंताच्या प्रमुख मागणी, समस्या या आजपर्यंत शासन दरबारी आ. डॉ. राहूल पाटील यांनी मांडल्या आहेत. यात नवीन नाट्यगृह निर्मीतीमध्ये त्यांनी विशेष प्रयत्न केले. वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा केला. आगामी काळात या नाट्यगृहासाठी निधी आणण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन या प्रसंगी डॉ.विवेक नावंदर यांनी उपस्थितांना दिले.
शहरातील स्थानिक कलावंताची बैठक वैष्णवी मंगल कार्यालयात रविवार (दि.11)रोजी पार पडली.
या बैठकीस विजय करभाजन, किशोर पुराणिक, पांचाळ, सूकते, संजय पांडे, कुलकर्णी, उपेंद्र दुधगावकर, संकेत पांडे, चांदजकर यांच्यासह शहरातील कलावंत उपस्थित होते.
स्थानिक कलावंतांनी परभणी शहराचे नाव जगभरात आपल्या कलेच्या माध्यमातून पोहचविले आहे. त्यांना विविध बाबींची सुविधा परभणी शहरात उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले. यापूढेही त्यांची कलावंताना साथ राहिल.याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी, गायक कलावंत तथा लोककलावंत यांची प्रचंड उपस्थिती होती. त्यात कलावंतांच्या समस्या व विविध मागण्यावर चर्चा झाली. समस्या मार्गी कशा लागतील या संदर्भाने भरीव प्रयत्न केले जातील, असे डॉ. विवेक नावंदर यांनी सांगितले.
निर्माल्य संकलन ग्रुपचा डॉ राहुल पाटील यांना पाठिंबा
आ. डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात निर्माल्य संकलन ग्रुपतर्फे बैठक घेण्यात आली. महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे परभणीचे उमेदवार आ. डॉ. राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीस निर्माल्य संकलन ग्रुप, ज्येष्ठ नागरिक मंचचे सदस्य, ब्राह्मण समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, पुजारी उपस्थित होते.
यावेळी शिवाजीराव वांगे, नित्रुडकर गुरुजी, वेंकटेश शर्मा पदु देवा जोशी पालमकर, विलास तळणीकर, गजानन जोशी, कुलकर्णी, यांच्यासह असंख्य निर्माल्य संकलन ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
निर्माल्य संकलन ग्रुपचे ८० हून अधिक सदस्य उपस्थित होते. आ.डॉ. राहुल पाटील यांना आशीर्वाद देत या निवडणुकीत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.


