परभणी,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ ही परभणी मुख्यालयातील 12 उपकेंद्रावर रविवार दि. 1 डिसेंबर, 2024 रोजी पार पडली. सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते 12 वाजता 1987 विध्यार्थी उपस्थित तर 1020 अनुउपस्थित होते तर दुपारच्या सत्रात 1972 उपस्थिती तर 1035 विध्यार्थी अनुपस्थिती होते
शहरातील 1) ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी 2) कै. रावसाहेब जामकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, जिंतूर रोड, परभणी 3) शारदा महाविद्यालय, सुभाष रोड, परभणी 4) बालविद्या मंदिर विद्यालय, नानलपेठ, शिवाजी पार्क, परभणी 5) श्री शिवाजी महाविद्यालय (ग्राऊंड फ्लोअर), वसमत रोड, परभणी 6) एन.व्ही.एस.मराठवाडा हायस्कूल, शिवाजी नगर, वसमत रोड, परभणी 7) गांधी विद्यालय, कृषी सारथी कॉलनी, वसमत रोड, परभणी 8) बालविद्या मंदिर हायस्कुल, वैभव नगर, देशमुख हॉटेल जवळ, परभणी 9) भारतीय बालविद्या मंदिर, ममता कॉलनी, कारेगाव रोड, परभणी 10) कै. मुंजाजी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर, श्रीहरी नगर, खानापूर फाट्याजवळ, परभणी 11) संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, वसमत रोड, परभणी 12) वसंतराव नाईक माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, सुपर कार्पेट जवळ, परभणी या केंद्रांवर परीक्षा पार पडली
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप परीक्षा प्रमुख म्हणून निवास उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, भरारी पथक प्रमुख उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, अभि रक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये परीक्षा पार पडली.
भरारी पथक प्रमुख जीवराज डापकर यांनी सर्व परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. परीक्षा केंद्र परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
परीक्षा यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर प्रदीप मुनेश्वर, विकास सायगुंडे यांनी परिश्रम घेतले. (छाया- उत्तम बोरसुरीकर)



