परभणी ( प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे भोगाव साबळे येथील गाळमुक्त धरण, गाळ मुक्त शिवार अभियाना अंतर्गत झालेला भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे ग्रामस्थांनी केली.
महात्मा ज्योतीबा फुले खोपडी यवतमाळ या सेवाभावी संस्था मार्फत दिनांक 18 में 2023 ते 29 में 2023 या कलावधीत मोजे भोगाव (साबळे) बेबील शेक-यांना तलावातील गाळ काढण्यासाठी अनुदान देण्यात आले होते. परंतु संबंधित ग्रामपंचायत यांनी शेतकऱ्याशी पन्नास टक्के रक्कम तुला व पन्नास टक्के रक्कम मला असा करार करून गाजर टाकलेल्या 55 लोकांची बनावट यादी तयार केली. संबंधित एजन्सी व जलसंधारण अधिकारी बांनी फक्त 10 दिवस जे सी बी चालवून 50 दिवसाचे बिल उचलून भ्रष्टाचार केला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलेय. (छाया- संजय घनसावंत)
या दोन्ही प्रकरणाची कसून चौकसी करून संबंधीतावर कठोर कार्यवाही करावी आणि संबंधितः शेतकऱ्यााना न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते आनंद भरोसे उपस्थित होते.
या निवेदनावर दिलीप रंगनाधरान साबळे, कैलास बाबासाहेन साबळे, बाबाराव रुस्तुमराव साबळे, अमोल अशोकराव साबळे, विकास प्रभाकर साबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


