परभणी (प्रतिनिधी) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेनंतर शहरात झालेल्या तोंडफोडी च्या पार्श्वभूमीवर अटक करण्यात आलेल्या काही लोकांपैकी शंकरनगर भागातील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय युवकाचा रविवारी न्यायालयीन कोठडीत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आज दिनांक 16 रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंदला परभणी शहरात कडकडीत प्रतिसाद पाहावयास मिळत आहे.
शहरात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठान बंद ठेवली आहे. तसेच प्रशासनाच्या वतीने सुद्धा चौक बंदोबस्त करण्यात आला आहे . पोलीस प्रशासनाच्या वतीने जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर पोलिसांचे काही फिरते पथक शहरात गस्त घालत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन यावर लक्ष ठेवून आहे. (छाया – उत्तम बोरसुरीकर)



