परभणी (प्रतिनिधी) सेलू येथे राज्यस्तरीय आदर्श जिल्हा पत्रकार संघ व आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुकाध्यक्षांचा मेळावा शनिवार 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याहस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून ना. संजय शिरसाठ हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातच पत्रकारितेत योगदान देणार्या पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यता येणार असून या कार्यक्रमास जिल्हाभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परभणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके यांच्यासह कार्याध्यक्ष लक्ष्मन मानोलीकर व सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.
सेलूच्या साई नाट्यगृहामध्ये 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून यासाठी परिषदेच्या पदाधिकार्यांसह जिल्हा पत्रकार संघ व सेलू तलाुका पत्रकार रसंघाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या कार्यक्रमात रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा व वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहेत. त्याच बरोबर राज्यभरातल्या तालुकाध्यक्षांचा मेळावाही संपन्न होणार आहे. मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, उदघाटक पालकमंत्री मेघना बोर्डीकर तर अध्यक्षस्थानी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख हे असणार आहेत. या सोहळ्यात न्यूज 18 लोकमतचे अँकर व प्रोड्युसर विशाल परदेशी यांचे व्याख्यान होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, यांच्यासह स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष विनोद बोराडेय यांची उपस्थित राहणार आहे. तसेच आमदार राजेश विटेकर, माजी आमदार हरिभाउ लहाने, माजी आमदार विजय भांबळे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, डॉ. संजय रोडगे, अशोक काकडे, नंदकिशोर बाहेती, जयप्रकाश बिहाणी, शेख राज याचीं उपस्थिती राहणार आहे. याच सोहळ्यात पत्रकारितेत योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यीक तथा पत्रकार डॉ. आसाराम लोमटे, डी.व्ही. मुळे व कांचन कोरडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजसाठी परिषदेचे सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, कोषाध्यक्ष मन्सूर शेख, डिजीटल मिडीयाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, विभागीय सचिव रवि उबाळे, सचिन शिवशेट्टे, पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हा सरचिटणीस मोहमद इलियास, कार्याध्यक्ष संजय मुंडे, शेख मोहसीन, निसार पठाण, सतिश आकात, लक्ष्मण मानोलीकर, राजू हट्टेकर, रेवणअप्पा साळेगावकर, रामेश्वर बहिरट, डा. विलास मोरे, अबरार बेग, रमेश खराडे, राहूल खपले, दिलीप मोरे, पुनमचंद खोना, सतिश गरड, महादेव रिी, निशीकांत रोडगे, रोहित झोल, असगर खान, जावेद कुरेशी, श्रीपाद रोडगे, नितीन कुंभकर्ण, निरज लोया, संदिप वरकड, दिपक जडे, महेश राउत, विठ्ठल राउत, गणेश सवणे, वसंत आवटे, आदी पुढाकार घेत आहेत. या सोहळ्यासाठी जिल्हाभरातून पत्रकारांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर यांच्यासह पदाधिकार्यांनी केले आहे.


