परभणी (प्रतिनिधी) परभणी म्हणजे शेतक-यांसाठी नव्या उद्योगाची शेतकी शिक्षणाची, तंत्रज्ञानाची व आधुनिक प्रयोगाची जणू कर्मभूमीच आहे. शेतक-यांकरीता अनेक नवनविन तंत्रज्ञान व माहिती यांना बळ मिळावे, “कृषि विस्तारातून शेतकरी विकास हाच कृषि विभागाचा ध्यास” या उद्देशाने दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी २०२५ रोजी संत तुकाराम महाविद्यालय, वसमत रोड, परभणी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी व संजीवनी मित्र मंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
सदर महोत्सवास मा.ना. डॉ. उदय सामंत (उद्योग, मराठी भाषा मंत्री म.रा.), मा.ना.सौ मेघना बोर्डीकर साकोरे (राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी जिल्हा), मा. खा. डॉ. फौजिया खान (राज्यसभा सदस्य), मा.खा. डॉ. श्रीकांत शिंदे (लोकसभा सदस्य) तसेच मा. खा.श्री संजय जाधव (लोकसभा सदस्य परभणी) व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शेतक-यांना येणा-या आसमानी संकटांवर मात करण्यासाठी नविन उपाययोजना स्वतःच करता याव्यात. शेतीमाल व्यवस्थापन, प्रक्रिया व विपणन क्षेत्रात स्वावलंबी होता यावे यासाठी कृषि प्रदर्शनाच्या माध्यमातुन कृषि माहिती देण्यात येणार आहे. जिल्हयातील व तालुकयातील शेतकरी यांच्याकरीता पिकविषयक चर्चासत्रे करीता तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, १ दिवसीय पशुप्रदर्शन, प्रगतशील शेतक-यांचा गौरव, उत्कृष्ट महिला बचत गटांचा गौरव यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कृषि उत्पादकांचे २०० स्टॉल्स, महिलांसाठी गृहउपयोगी वस्तुंचे दालन तसेच सौरउर्जेवरील उत्पादनाचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवातुन शेतक-यांच्या असंख्य उद्योगांना आणि कृषि उत्पादकांना प्रचंड मोठी बाजारपेठ खुली होण्याची लक्षणीय संधी आहे.
तरी, आपल्या जिल्हयातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व प्रयोगशील/प्रगतशील यांनी सदर महोत्सवास उपस्थित राहुन नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन श्री दौलत सुदामराव चव्हाण जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत करण्यात येत आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


