परभणी,(प्रतिनिधी) : नाना-नानी उद्यानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचे लेआऊट तयार करणार्या एस.बी. आर्किटेक फर्मचे बिल थकविल्याबद्दल येथील न्यायालयाने महानगरपालिकेंतर्गत फर्निचर जप्त करण्याचे वॉरंट बजावले आहे.
नाना-नानी उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लेऑऊट तयार करण्यासह उद्यानाच्या ड्राइंग, डिझाईनींग व अंतर्गत सजावटीच्या कामाकरीता महापालिका प्रशासनाने तत्कालीन पालकमंत्री यांच्या निधीतून पाच कोटी मंजूर केल्या गेले होते. त्या संबंधिचे एस्टिमेट, डिजाइनचे काम 2 टक्के दराने येथील प्रसिध्द कंत्राटदार सुभाष बाकळे यांच्या एस. बी. अर्किटेक्ट फर्मला मिळाले होते. बाकळे यांनी सर्व एस्टिमेट व ड्रॉईग, डिजाइन, लॉन व उद्यानातील खेळणी तसेच जेष्ठ नागरिकासाठी सोयी-सुविधाचे लेऑउट प्लान स्टील डिजाइनसह वेळेवर महापालिकेत दाखल केले. त्या प्रमाणे महापालिकेने निविदा मागवल्या व एका कंत्राटदारास काम करण्याचे आदेशसुध्दा बहाल केले. काम सुरू केल्यानंतर बाकळे यांनी त्याचे अर्किटेक्टचे बील दोन टक्के प्रमाणे 8 लाख 66 हजाराचे शहर अभियंता कार्यालयात दाखल केले व बील रेकॉर्ड करून पेमेंट चा चेक देण्यात यावा म्हणून पत्र देखील दिले. परंतू, खाबुगीरी करणार्या अभियंत्यांनी व आधिकार्यांनी बील रेकॉर्ड करण्यास चालढकल सुरु केली. बाकळे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे त्याचे बील नाहक त्रास देण्यासाठी दोन टक्याऐवजी अर्धा टक्याप्रमाणे अशी खाडाखोड करून एमबीत रेकॉर्ड दाखल केले.
या प्रकाराने संतप्त बाकळे यांनी कामाचे आदेश असताना व काम पुर्ण करुन देखील पुर्ण बील मिळत नाही म्हणून सरळ विधिज्ञ राजेंद्र सराफ यांच्या मार्फत न्यायालयात बीलाच्या वसूली साठी 2017 मधे दावा दाखल केला होता. न्यायालयाने सर्व कागदपत्राची छाननी केली व सूनावनी अखेर वादी प्रतीवादी यांचे जाबजबाब न्यायालयासमोर पुर्ण झाल्यावर महापालिकेस व्याजासह रक्कम देण्याचे आदेश बजावले. तरी देखील महापालिकेतील अभियंत्या व आधिकारी यांनी न्यायालयाच्या आदेशास लालफितीत बंद करून ठेवले. ही बाब बाकळे यांनी अॅड. राजेंद्र सराफ यांच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा अॅड. सराफ यांनी न्यायालयात पैसे वसुलीसाठी अर्ज दाखल केला. व महापालिकेतील कॉम्पूटर, टेबल, खुर्च्या, सोफासेट, एयर कंडीशनर ईत्यादी सामानाच्या जप्तीचे वॉरट काढले.
दरम्यान, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेलीफ बोचरे यांची न्यायालयाने नियुक्त केली असता कारवाईसाठी महापालिका आयुक्ताची भेट घेऊन जप्तीचे वॉरट दाखविण्यात आल्यानंतर आयुक्त धैर्यशील जाधव यांनी आपण नवीन कार्यभार स्वीकारला असल्यामुळे चार दिवसात ह्यावर निर्णय देऊन न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असा बाकळे यांना शब्द दिला.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


