परभणी,(प्रतिनिधी) : ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) सहसचिवपदी येथील कर सल्लागार राजकुमार भांबरे यांची सलग दुसर्यांदा नियुक्ती झाली आहे.
ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार शंकरराव भांबरे विजयी झाले होते. त्यानंतर 2024-25 साठी भांबरे यांची सहसचिवपदी निवड झाली. या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर 2025-26 साठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत भांबरे यांची मराठवाडा विभागातून सलग दुसर्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आभासी बैठकीद्वारे 2025-26 या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन गांधी (मुंबई), उपाध्यक्षपदी सीए अक्षय मोदी (गुजरात), उपाध्यक्षपदी अॅड. नरेंद्र सोनवणे (पुणे), सचिवपदी कैलास काशीद, कोषाध्यक्षपदी सुनील देशमुख (नाशिक), सहसचिवपदी राजकुमार भांबरे (परभणी), सहसचिवपदी कुणाल आईस्क्रीमवाला (गुजरात) यांची निवड करण्यात आली आहे.
देश पातळीवर काम करणार्या या संघटनेच्या वर्ष 2025-26 करिता पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. एआयएफटीपी ही कर सल्लागाराची संस्था गेल्या 50 वर्षापासून कार्यरत आहे. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र एआयएफटीपीसोबत व जीएसटी पीएएम मुंबई यांच्यासोबत कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचे काम सहसचिव राजकुमार भांबरे करत आहेत. संघटनेच्या सहसचिवपदी राजकुमार भांबरे यांची नियुक्ती झाल्याबद्दल परभणी शहरातील व्यापारी, कर सल्लागार, सीए., सामाजिक संघटना व मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


