परभणी :(प्रतिनिधी) आर.पी हॉस्पिटल आणि परभणी मेडीकल कॉलेज येथे विविध आजारावार उपचार व शस्त्रक्रिया केल्या आहेत. रुग्णसेवे करिता आणखी एक महत्वपूर्ण पाउल टाकत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आॅडिओमेट्री (कानाची श्रवण क्षमता तपासणी मशीन )सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष आ.डॉ.राहुल पाटील, आर. पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, डॉ फैज उल्ल रेहमान व हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थीत होते. यावेळी बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की आज अत्याधुनिक आॅडिओमेट्री (कानाची श्रवण क्षमता तपासणी मशीन) युनिट असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. दैनंदिन जीवनशैली तसेच २१व्या शतकातील व्यक्ती जास्त प्रमाणावर यंत्राचा वापर करत असून त्यामुळे नवजात बालकांना ऐकू न येणे व वृद्धांमध्ये निर्माण झालेल्या कर्णबधीरते मुळे ऐकू न येण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे आहे. त्यामुळे आजारपणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे शक्य होते. रुग्णालयाच्या महत्वपूर्ण व विधायक भूमिकेचे कौतुक करावे तितके कमी आहे. या सेन्टरमुळे सर्व सामान्य रुग्णाला मदत मिळेल असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी आ. डॉ. पाटील म्हणाले की शून्य कर्णबतीरता हे ध्येय ठेवून पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगितले. आॅडिओमेट्री मशीनद्वारे तपासणी करून रुग्णांना योग्य सल्ला आणि उपचार प्रदान करण्यात येणार आहे. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी या अत्याधुनिक आॅडिओमेट्री यंत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी मेडिकल कॉलेज व आर.पी.हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी गुणवंत अहिरे, राहुल कांबळे, स्वप्नील बोर्डे, विशाल आहेर व राहुल गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


