परभणी, (प्रतिनिधी) परभणी शहरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नियोजित पुतळा परिसरातील अतिक्रमण काढून पुतळा तात्काळ उभारावा यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आ.डॉ.राहुल पाटील यांचा समस्त धनगर समाज बांधवांनी सत्कार करून आभार मानले आहेत.
शहरातील स्टेडियम परिसरामध्ये महापालिकेने ठराव घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागा निश्चित केली आहे, परंतु या जागेवर काही दिवसापासून अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आमदार डॉ.राहुल पाटील हे सातत्याने महानगरपालिका आणि नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. विधानसभा अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आमदार डॉ.पाटील यांनी याबाबत आवाज उठवला सातत्याने प्रश्न लावून धरल्याने हे अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, लवकरच या ठिकाणी भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे, आमदार पाटील यांच्या पाठपुरावाला यश आल्याने धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने आमदार पाटील यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले आहेत.
यावेळी अरविंद देशमुख,प्रशास ठाकुर,संग्राम जामकर,अजित यादव, अनंतराव बनसोडे, प्रा. तुकाराम साठे, सुरेश चांदणे, लक्ष्मण बोबडे, सचिन गारुडी, गणेश मुळे, कैलास खनपटे, ज्ञानेश्वर खनपटे, कृष्णा गलांडे, किशोर लेंगुळे,मुंजा खुणे, श्रीरंग झोरे, रंजीत बनसोडे, यशोदीप नाईकवाडे,गुणाजी गलांडे आदी उपस्थित होते.


