परभणी (प्रतिनिधी) बुधवार दि. 12 मार्च रोजी महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत कान्हेकर हॉस्पिटल, शास्त्री नगर परभणी येथे तज्ञ डॉक्टर डॉ मिलिंद कान्हेकर MBBS MS ( पोटाचे विकार तज्ञ) डॉ मनिषा कान्हेकर MBBS DGO( स्त्री रोग विशेषज्ञ) हे रुग्णाची तपासणी करणार आहेत. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांची दुर्बिणीद्वारे पचन संस्था व अन्न नलिकाची 50% सवलतीत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पोटदुखी, पोट फुगणे, अपचन, मळमळ, उलटी यावर निदान आणि उपचार, मूळव्याध निदान आणि उपचार, मूत्ररोग निदान आणि उपचार , डे केस सर्जरी सवलतीत, गॅस्ट्रोस्कोपी, लॅपरोस्कोपी , कोलोनोस्कोपी माफक दरात करण्यात येणार आहे.
स्त्री रोग चिकित्सा मध्ये स्त्रियांचे मासिक पाळीतील आजार निदान आणि उपचार, अंगदुखी , कंबरदुखी , अशक्त पणा, पाळी जाताना होणारा त्रास ( मेनोपॉज), स्त्री वंध्यत्व चिकित्सा ,कुटुंब नियोजन समुपदेशन , आहार मार्गदर्शन, कॅन्सर निदान आणि उपचार , गर्भाशय पिशवीचे आजार उदा पिशवी मध्ये गाठ, पिशवी खाली येणे इत्यादि तसेच रक्त तपासणी व गरजू रुग्णांची फ्री ब्लड शुगर तपासणी वजन, ब्लड प्रेशर, पल्स ऑक्सिमीटर तपासणी व गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे.
नाव नोंदणी साठी 9422972188, 8830542198 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


