ठिकठिकाणी मार्कींग करून अतिक्रमणे जमीनदोस्त; काही ठिकाणी विरोध
परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील मध्य वस्तीसह चोहोबाजूंच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे महानगरपालिकेच्या पथकांद्वारे हटविण्यास सुरुवात झाली असून दुसर्या दिवशीही शहरातील विविध ठिकाणी खेळ अतिक्रमण करण्यात आले याला काही ठिकाणी विरोध ही पत्करावा लागला तर काही नाही स्वतःहून आपापले अतिक्रमण काढले
अतिक्रमण विभागामार्फत प्रभाग समिती निहाय अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली. प्रभाग समिती अ चे सहायक आयुक्त यांचे नियंत्रणात जुना पेडगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येऊन धाररोड परिसरात मार्कीग करण्यात आली. प्रभाग समिती ब चे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी प्रभाग समिती कार्यालय परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सूरूवात करून कडबी मंडी व कालाबावर परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली.
प्रभाग समिती क च्या सहायक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात प्रभाग समिती क परिसरातील डॉ. आंबेडकर पुतळा परिसर, स्टेशन परिसर, बसस्टँड व धाररोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. नागरीकांनीही वेळ घेत स्व:ताची अतिक्रमणे काढून घेत महापालिका प्रशासनास सहकार्य केले.
या पथकामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक करून गायकवाड, विकास रत्नपारखे, मेहराज अहेमद, शाखा अभियंता राहुल धुतडे, दिनेश भंडे, रिजवान, कनिष्ठ अभियंता पवन देशमुख, पंकज देशमुख, संतोष लोंढे, विनय ठाकुर, स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकळे, लक्ष्मण जोगदंड, श्रीकांत कुरा, अब्दुल शादाब, सौरभ जोगदंड, न्यायरत्न घुगे, मुकादम, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.आयुक्त धैर्यशील जाधव यांनी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण धारकांना स्वत:ची अतिक्रमणे काढून घेण्याचे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.