पालम (प्रतिनिधी) दि.25 रोजी पालम शहर बंद चे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यापारी, हॉटेलमालक, दुकानदार, यांनी स्वयंफुर्रतेनी बंचे आयोजन केले होते.
तसेच विविध सामाजिक संघटना सकल समाजा कडून पालम नायब तहसिलदार राजेश्वर पवळे, पोलीस निरीक्षक सुरेश थोरात याना निवेदन देण्यात आले,या निवेदनात जम्मू-काश्मीर राज्यातील पर्यटनस्थळ पहेलगाम या ठिकाणी हिंदू बांधव का म्हणून गोळ्या घालण्यात आलेल्या अतिरेक्यांनी बेछूट गोळ्या झाडून 27 लोकांचा जीव जीव घेतलेला आहे तर काही जणांना गंभीर जखमी केले. या मुळे पालम
येथील व्यापाऱ्यांनी दिनांक 25 एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ स्वयं स्फूर्तीने शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले.
दरम्यान सकाळी 11 वाजता सर्व सामाजिक बांधव एकत्र येऊन अतिरेकी भ्याड हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या हिंदू बांधवांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदविला. या वेळी निवेदनावर लिबाजी टोले,रघुभैय्या दुधाटे,राहुल गायकवाड,बापूराव दिवटे,प्रविन सिरस्कर,मावली घोरपडे अवधुत पौळ यांच्या सह असख्य समाज बाधव उपस्थित होते.