परभणी (प्रतिनिधी) मागील बरेच दिवसापासून पेडगावं येथील पाणी प्रश्न गंभीर बनला असून गावकऱ्यांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आले.
जल जीवन मिशन अंतर्गत योजनेचे पाणी यावर्षी गावकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते मात्र तेही काम बऱ्याच दिवसापासून रेंगाळत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतने हा प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी उपायोजना करणे आवश्यक होते, मात्र ग्रामपंचायत च्या वतीने कुठलीही पर्याय उपाययोजनांना करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांच्या वतीने आज ग्रामपंचायत मोर्चा घागर मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला उत्तर देण्यासाठी ग्रामपंचायत चे कुणीही जबाबदार लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संतप्त महिलांनी पेडगाव ग्रामपंचायतला टाळे ठोकले. याप्रसंगी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व गणेश देशमुख यांनी केले.. तसेच एक मे पर्यंत जर गावकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत समोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा गणेश देशमुख यांनी दिला.या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुहास भैया देशमुख,ग्रामपंचायत सदस्य विलासराव देशमुख, मोबीन कुरेशी,शेख खलील, अनिल असोरे तातेराव हरकळ संजय गायकवाड, श्रीधर देशमुख शेख शगीर, शेख सादेक, लक्ष्मण देशमुख, गजानन देशमुख, सचिन सराफ सह युवक,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*.