परभणी (प्रतिनिधी) शहरातील पेडगाव रोड वरील वैभव नगर प्रताप नगर इनायत नगर परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्रा पैकी एका कुत्र्याने आज शुक्रवारी सकाळी आठ जणांचा चावा घेतला असून या पिसाळलेल्या कुत्र्याचं ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.
शहरातील जुना पेडगाव परिसरात कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ही कुत्री आता नागरिकांवर हल्ले करू लागले आहेत रात्री अपरात्री प्रवास होऊन येणाऱ्या प्रवाशांवर देखील हल्ला करीत आहेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास या कुत्र्यांपैकी एका पिसाळलेल्या कुत्र्याने एका वृद्ध महिलासह इतर सात जणांचा चावा घेतला. या रुग्णांना ताबडतोब रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारार्थ दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. या परिसरात वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्येवर ताबडतोब अंकुश आणावा व ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी पेडगाव रोड परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


