ताडकळस (प्रतिनिधी)म हाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.कै. कमळाबाई वडकुते माध्यमिक विद्यालय, ताडकळस या विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा निकाल शाळेचा एकूण निकाल 96.22% लागला आहे.
एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 53,उत्तीर्ण विद्यार्थी 51, अनुत्तीर्ण विद्यार्थी 02 सर्वप्रथम कु. दळवी मयुरी मारुती 93.80%द्वितीय क्रमांक कु. लेंडाळे गायत्री भागवतराव 86.40% तृतीय क्रमांक मगरे प्रणिता प्रकाश 80.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. रामराव वडकुते,कार्याध्यक्ष विठ्ठलराव वडकुते,अध्यक्ष दिलीपराव वडकुते , विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून गौरविण्यात आले.