परभणी: (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री .एकनाथजी शिंदे व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशावरून दि. २२ रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन दि. २२ गुरुवार रोजी सकाळी १० वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशवासीयांच्या भावना ओळखून पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ‘ऑपरेशन सिंदूर’ याद्वारे अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान केले. भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ आज राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देशप्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या विजयी यशाचा, सीमेवरील सैनिकांचा सन्मान व मनोबल वाढावे, यासाठी परभणी शहरातून शिवसेने तर्फे भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले, असे यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी सांगितले. हि बाईक रॅली वसमत रोड येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून छ. शिवाजी महाराज पुतळा-रेल्वे स्टेशन-बस्थानक-उड्डाण पूल- मार्गे विसावा चौक येथून छ. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहचली यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पुजन, अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली आर्पण करून राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माजी खासदार सुरेशराव जाधव, लोकसभा प्रमुख राजु कापसे, भास्करराव लंगोटे, महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख माणिक पौंढे, प्रल्हाद होगे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपटे, तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, युवासेना जिल्हाप्रमुख आप्पाराव वावरे, युवा सेना शहरप्रमुख ईशान आवचार, युवा सेना उपशहरप्रमुख राहुल शिंदे, सखुबाई लटपटे, कल्पना दळवी, अर्चना चिंचाने, शीलाताई शेटे, पुजाताई शेटे, युवती जिल्हाप्रमुख प्रीती घुले, शेख शबीर, सचिन पाटील, बाळासाहेब मोहटे, कैलास पांगरकर, महेंद्र जोंधळे, भुजंगराव धस, संदीप जाधव, सरपंच उद्धवराव गायकवाड, संजय बेटकर, गुलाबराव पंढरकर, अजित गरुड, गोविंदराव जोगदंड, शिवप्रसाद लोखंडे, नयनेश देशमुख, उमाकांत भरोसे, पप्पु खुळे, सुभाषराव गरुड, बंडू झाडे, ज्ञानेश्वर रसाळ, लक्ष्मण आरमाळ, ज्ञानेश्वर शिंदे, यांच्यासह महिला, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.