परभणी (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट निमित्त शहरातील वसमत रोड येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमान पासून राजगोपालाचार्य उद्यान पर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला हजारोच्या संख्येने देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा मोठ्या उस्ताहाने काढण्यात आली.
या वेळी शहरातील आजी माजी सैनिक, राज्यस्तरीय स्केटिंग खेळाडू, भारत मातेचा सजीव देखावा, ३०० मीटर तिरंगा अशा अनेक बाबींनी पदयात्रेची शोभा वाढवली. या वेळी ABVP संगठना, स्केटिंग असोसिएशन, माजी सैनिक असोसिएशन चे पदाधिकारी आदींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. पदयात्रेचे आयोजन भाजपा युवा मोर्चा परभणी महानगर च्या वतीने अक्षय डहाळे, अभिषेक वाकोडकर, रामदास पवार, अनिल रेंगे, राज निलावार यांनी केले. या वेळी प्रमोद दादा वाकोडकर, संजय रिझवानी, मोहन कुलकर्णी, कमलकिशोर अग्रवाल, चंद्रकांत डहाळे, सुनील देशमुख, रितेश जैन, प्रदीप तांदळे, मंगल ताई मुद्गलकर, राजेश देशपांडे, प्रभावती अन्नपूर्वे, दिनेश नरवाडकर, मंजुषा ताई नरवाडकर, विजयाताई कातकडे, सुनीता ताई घुगे, आनंद बनसोडे, स्वप्नील पिंगळकर, रोहित जगदाळे, स्वप्नील किटे, सुशांत एकोरगे, माऊली कोपरे, ओम मुदिराज, अनंत गिरी, मुक्तेश भंडारे
आदी उपस्थित होते.


