परभणी (प्रतिनिधी) परभणी हिंगोली जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गटच्या क व परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने वकील संघाच्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार कार्यक्रम दिनांक 05 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 08=00 वाजता परभणीतील जेष्ठ विधीज्ञ साहेबराव अडकिने यांच्या कार्यालयामध्ये संपन्न झाला.
सदर कार्यक्रमांमध्ये वकील संघाचे संघाचे अध्यक्ष म्हणून बहुमताने निवडून आल्याबद्दल अँड साहेबराव अडकिने तसेच सचिव म्हणून अँड मदन बोबडे उपाध्यक्ष म्हणून अँड विनोद रसाळ, कोषाध्यक्ष म्हणून अँड जाधव, व सहसचिव म्हणून अँड देशमुख मॅडम यांचा सत्कार परभणी जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री राजकुमार गायके, संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष निंबरे पाटील, संघटनेचे सचिव अमृतराव कदम, कार्यकारिणी सदस्य रावसाहेब कदम, दीपक पंढरकर, बाबुराव राठोड,राजेश काळे, गणेश खाडिलकर, प्रभाकर राऊत यांनी केला तसेच वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून अँड रासवे, अँड अवचार व सरदार सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारे अँड परमेश्वर शिंदे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमृतराव कदम यांनी केले व सर्वांचे आभार व्यक्त केले


