परभणी (प्रतिनिधी) भारतीय जनता अनुसूचित जाती मोर्चा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. सुमित भालेराव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कारेगाव रोड परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री मा. मेघनादीदी बोर्डीकर यांच्या शुभहस्ते व भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हे जनसंपर्क कार्यालय जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी प्रभावी व्यासपीठ ठरेल. नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासोबतच शासकीय योजना, विकासकामे आणि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी श्री. सुमित भालेराव यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


