परभणी, (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्डे व उघड्या गटारांमुळे (मॅनहोल) झालेल्या मृत्यू वा दुखापतीच्या घटनांबाबत आता पीडितांना आर्थिक मदतीचा दिलासा मिळणार आहे.
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल पीआयएल क्र. ७१/२०१३ (PIL No. 71/2013) मधील मा. न्यायालयाचे आदेशानुसार रस्त्यावरील खड्डे व उघड्या गटारांमुळे (मॅनहोल) झालेल्या मृत/दुखापग्रस्त व्यक्ती/कायदेशीर वारसांना दुखापतीच्या प्रकरणात ५०,००० ते २,५०,००० व मृत व्यक्तीच्या बाबतीत ६,००,००० रुपये भरपाई देणे संदर्भात नागरी क्षेत्रामध्ये संबधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आयुक्त/मुख्याधिकारी व बिगर नागरीक्षेत्राच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असुन अशी घटना घडल्यास संबधीतांनी तात्काळ समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
***


