परभणी,(प्रतिनिधी) : पाथरी येथील एका 14 वर्षीय मुलीचे अश्लिल फोटो काढून त्याद्वारे तीच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करणार्या व जीवे मारण्याची धमकी देणार्या आरोपीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश उज्ज्वला एम. नंदेश्वर यांनी पोक्सो कलम 6 प्रमाणे 20 वर्षे सक्त मजूरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजूरी तसेच भादंवि कलम 506 प्रमाणे एक वर्षे सक्त मजूरी व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 1 महिना सक्त मजूरीची शिक्षा ठोठावली.
डोंबिवली येथील टिळक नगर पोलिस ठाण्यात या 14 वर्षीय पिडीत मुलीने 27 जून 2024 रोजी एक तक्रार दाखल केली. त्याद्वारे, ती तीच्या आई-वडील व भावंडांसह पाथरीत घरी असतांना मे 2024 मध्ये एका आरोपीने ती झोपेत असतांना अश्लिल फोटो काढले व ते फोटो दाखवून तीच्याशी लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळभे संबंधित पिडीतेने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. परंतु, आरोपीने त्याचे कृत्य थांबविले नाही. दोन तीन वेळा पुन्हा त्याने पिडीतेवर लैंगिक अत्याचार केला. शेवटी या पिडीतेने ही बाबत तीच्या आईला सांगितली. त्यावर तिची आई व तिच्या आईने तिचे माहेरी येथे म्हणजे डोंबिवली येथील पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. डोंबिवली पोलिसांनी संबंधित गुन्हा नोंदवून पुढील तपासाकरीता तो पाथरी पोलिसांकडे वर्ग केला.
पाथरी पोलिसांनी या प्रकरणात संबंधित आरोपीविरोधात तपास करीत गुन्हे दाखल केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांभ स्वामी यांनी या गुन्ह्याचा तपास करीत साक्षीदारांचे जवाब नोंदविले. तसेच या आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरलेला मोबाईल जप्त केला. तपासा दरम्यान जप्त मोबाईल तांत्रिक विश्लेषणाकरीता न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नांदेडला पाठविण्यात आला. आरोपीने त्यास अटक करण्यापूर्वीच मोबाईलवरील संपूर्ण डाटा डिलिट केला होता. परंतु, तांत्रिक विश्लेषणातून तो डाटा पुन्हा मिळविण्यात आला. त्यामध्ये आरोपीने त्या पिडीत मुलीचे काढलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ आढळून आले. तपासाअंती पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या न्यायालयात सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण 8 साक्षीदार तपासले. बचाव पक्षातर्फे एक साक्षीदार तपासला. सरकार पक्षातर्फे पिडीत आईची साक्ष महत्वाची ठरली. तांत्रिक विश्लेषण तज्ञ वल्लमवाड यांनी त्यांच्या साक्षीत त्यांनी जप्त मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण कसे केले, हे स्पष्ट करीत आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत तो डाटा परत मिळविला, हे नमूद केले. दरम्यान, प्रमुख जिल्हा न्यायाधीश नंदेश्वर यांनी संबंधित आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, दिलीप रेंगे, ट्रायल मॉनिटरींग सेलच्या वंदना आदोडे यांनी काम पाहिले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


