परभणी ( प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीने परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 135 व्या जयंतीनिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 09:00 वाजता करण्यात आले होते.

सुरुवातीस डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार जिल्हाध्यक्ष डॉ. एम. एम. भरणे, जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण यांच्या हस्ते अर्पन करुन पंचरंगी धम्मध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. समता सैनिक दलाच्या वतीने आनंदा भेरजे यांनी मानवंदना दिली. भिक्कु संघाच्या वतीने भंते पि. धम्मानंदजी यांनी ञिसरण पंचशील दिले.
कार्यक्रमास भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण , आमदार राहुल पाटील महापौर सय्यद इकबाल यांच्यासह जेष्ठ नेते बी. एच. सहजराव, व्ही. व्ही. वाघमारे, विश्वानाथ झोडपे, अविनाश सरवदे, सुनिल एस. पवार, शिवाजीराव वाव्हळे , राजकुमार येंगडे, भारत खाडे, अशोकराव कांबळे, नागसेन हत्तीअंबीरे, खराटे, गोपीनाथ कांबळे, भगवान काकडे, नागनाथ सोनुले, राहुल गायकवाड,डि. के. टोंम्पे , बी. जी. शिंदे, भारत देवरे, डी. एम. मगरे, उत्तम शिवभगत, एम. एम. बरे, दगडू भालेराव, राजकुमार साळवे, उत्तम रणवीर, नामदेव ढेपे, निवृत्ती गोधम, पी. एल. वानखेडे, उत्तम सुतार, सोपानराव खिल्लारे, के जि. लजडे,एस. एम. कांबळे, मुकुंद खाडे, सुभाष मकरंद, रमेश घणघाव, डी. एम. वाघमारे, चुडाजी धबाले, यांच्यासह राजकिय, सामाजीक व विविध क्षेञातील मान्यवरांसह बौध्द उपासक- उपासिका मोठ्या संखेने उपस्थितीत होते. शेवटी सरणत्तय घेउन कार्यक्रम संपवण्यात आला..



