परभणी (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक सांज वृत्तचे संपादक श्री विजयकुमार मुंदडा वय (६२) यांचे काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अपघाती निधन झाले. यांच्या वर आज बुधवार दि 6 रोजी गंगाखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
शहरातील वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी विधी महाविद्यालयासमोरील हॉटेल ओमकारेश्वर समोरील रस्ता ओलांडत असताना काल मंगळवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकीने गाडी क्र. (एम. एच. २२ ए. एच. ३४५८) या गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून जावई नातवंडे असा परिवार आहे. ते दैनिक सांज पालम वृत्तचे संस्थापक संपादक होते. दैनिक शब्दराजचे संपादक विवेक मुंदडा यांचे वडील होत.
मुंदडा कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात दैनिक लोकसंचार परिवार सहभागी आहे.


