परभणी ( प्रतिनिधी) गॅस सिलेंडरच्या सुरक्षित वापराविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्राहक कल्याण फाउंडेशन, दिल्ली यांनी तयार केलेले “भाई आया रे गॅस सिलेंडर” हे सुरक्षा गीत आता परभणी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरण वाहनांवर वाजवले जाणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. फाउंडेशनचे कार्यकारी संचालक शुभम रंगारी यांनी 28 एप्रिल 2026 रोजी याबाबत निवेदन सादर केले होते.
गॅस गळती, सिलेंडर हाताळणी आणि सुरक्षिततेचे नियम यांची माहिती लोकांपर्यंत सहज पोहोचावी, यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांनाही सुरक्षा नियमांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.


