परभणी,(प्रतिनिधी) : देवाभाऊ रजत योजना म्हणजे पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदयापर्यंत विकास संकल्पनेचाच प्रयत्न होय, असे मत राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘देवाभाऊ रजक’ योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर येथील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात बुधवार 22 जूलै रोजी नक्षत्र प्रताप नगर चौक येथील सभागृहात सकाळी नऊ वाजता करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 20 धोबी बांधवांना आधुनिक स्टीम आयर्निंग टेबलचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार परिणय फुके, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष उपेंद्र कवठेकर, नागपूर शहराध्यक्ष दयानंद तिवारी, मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी सचिव सुनील मित्रा तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी महसूलमंत्री बावनकुळे यांनी या योजनेचे मुक्तकंठाने कौतूक केले. अनुवंशिक परंपरेने धोबी व्यवसाय करणार्या व्यक्तीला स्वबळावर उभे राहण्यासाठी बदलत्या यांत्रिकी युगामध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन व नफा वाढवण्यासाठी भाजप उद्योग आघाडीची ही योजना निश्चितच कौतूकास्पद आहे. ही योजना म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयापर्यंत विकास या संकल्पनेचे मुहूर्त स्वरुप आहे. नाविन्यपूर्ण शासकीय योजनेमध्ये धोबी समाजातील लोकांना अशा पद्धतीचे आयर्निंग टेबल देता येतात का याबाबत गांभीर्याने विचार करू, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्यांना सक्षम करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले त्याचाच हा भाग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, यावेळी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी लाभार्थ्यांना नक्षत्र संपर्क कार्यालयात सात दिवस प्रशिक्षण देऊन नागपूर जिल्ह्यामध्ये 200 लघुउद्योग उभे करण्याचा मानस यावेळेस जाहीर केला.
या कार्यक्रमास उद्योग आघाडीचे सहसंयोजक विश्वजीत देशपांडे, हरीश भाटिया, डॉ. माधवी देशमुख, अभिषेक गजन, पंकज सिंग, सुधीर नाईक, इंद्रजीत राव, विक्रम देशपांडे, रामप्रसाद दांड, संजय कावडे, सतीश सोमाणी, समीर बाकरे, सुधीर घोडेस्वार, महिपाल सिटी, भगवान पाडळे, अनिल यशवंते, राजेंद्र तापडिया यांच्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योग आघाडीच्या पदाधिकार्यांनी विशेष परिश्रम घेतले.


