परभणी,(प्रतिनिधी) : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माधव नगर विभागाच्या वतीने 24 ऑक्टोंबर शनिवार रोजी विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला विजयादशमीचा उत्सव माधव नगर विभागात वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील मारोती मंदिरात 24 ऑक्टोंबर शनिवारी सायंकाळी 6.15 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह आलोक कुमार हे प्रमुख वक्ते म्हणून तर सेलू येथील उद्योजक अविनाश जयप्रकाश बियाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्व संघ स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात निर्धारीत वेळेच्या आत 15 मिनीटांनी सहकुटूंब उपस्थित रहावे, असे आवाहन माधव नगर विभागाचे कार्यवाह अजय हमदापुरकर यांनी केले आहे.
Tuesday, October 13
ताज्या बातम्या:
- आ. डॉ. राहुल पाटील यांच्या आश्वासनानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माधव नगर विभागाचा 24 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी उत्सव
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी अक्षय देशमुख यांची निवड
- राज्यात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविणार; संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी; चारा जतन, प्रक्रिया व उत्पादनावर भर
- दिवाळीत गड-किल्ल्यांच्या ‘दुर्गोत्सव २०२६’ मध्ये सहभागी व्हा!- दि. 5 ते 25 नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणीची सुविधा
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; आधार प्रमाणीकरणासाठी तिसरी यादी प्रसिद्ध; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- ॲग्रीव्हिजनच्या १०व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी परभणीच्या ओमकार डोके, समीक्षा सुतार आणि सिद्धी काशीकर या तिघांची निवड; राष्ट्रीय व्यासपीठावर परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
- नांदेड रेल्वे विभागाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 5.25 लाखांची वसुली : दोन दिवसांत 562 प्रकरणे उघड


