सानवी मोगल व ओवी ढेरे यांना जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सेलू (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळामार्फत शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील विविध माध्यमांच्या शाळांमध्ये राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा एकाच दिवशी चार गटांमध्ये घेण्यात आली.
या स्पर्धेत सेलू येथील एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या दोन विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. गट क्रमांक १ मध्ये कु. सानवी सुदर्शन मोगल हिने द्वितीय क्रमांक पटकावला, तर गट क्रमांक २ मध्ये कु. ओवी कैलास ढेरे हिने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, कलागुण आणि कला शिक्षक महादेव बोरकर यांचे मार्गदर्शन व मेहनत यांचा मोलाचा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य सोबत हिवराळे, अनिल कुमार व अब्दुल बादशहा यांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


