परभणीप्रतिनिधी) : गतवर्षी गाळप केलेल्या ऊस बिलातील प्रतिटन 300 रुपयांचा दुसरा हफ्ता दिवाळीपुर्वी शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 2 नोव्हेंबर रोजी गंगाखेड येथील उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री महादेव जानकर हे दोघे या मोर्चात सहभागी होणार आहेत. साखर कारखानदाराकडून ऊस उत्पादक शेतकर्यांची शुध्द फसवणूक केली जात असून त्यामुळे ऊस उत्पादक हैराण असल्याची माहिती या संघटनेचे नेते किशोर ढगे, पवन करवर यांनी दिली. यावेळी दत्ता चांगभले, योगेश फड, दिगंबर काळे, माधवराव धापसे, योगेश देशमुख, महावीर घोबाडे आदी उपस्थित होते.


