परभणी,(प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी परभणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मतदान प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात परभणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शेख सलमान शेख युनुस, आशिष हरकळ, जितेंद्र देशमुख, शेख नासेर, गुलमीर खान, अमोल जाधव, सुनील बाबा देशमुख, इम्रान हुसेनी, ज्ञानेश्वर वाघमारे, शेषराव देंडगे, प्रसाद डुकरे, बालासाहेब सामाले, शेख मुजमील, सय्यद मेराज, अरुण गव्हाणे, करण कांबळे, दीपक पवार, अशोक पवार, विष्णू गायकवाड, निखिल मांडे, मारोती नंद, विनोद कांबळे, बाबासाहेब खरात, दीक्षा शेळके, अलका भालेराव, सोनाली भालेराव, आम्रपाली शिंदे, मंगल गरुड, शोभा सोनकांबळे, विजयमाला दहे, पद्मावती शिसोदे, जानवी दहे, नाझिमा अन्सारी, मोबिन खुरेशी आणि युसुफ खान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकर्यांना तातडीने आर्थिक दिलासा मिळावा, तसेच मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची दखल घ्यावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. त्याद्वारे, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण साजरा करताना शेतकर्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करून ती दिवाळीपूर्वी शेतकर्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.


