सेलू,( प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या अभियंत्यांना कर्मचार्यांसमक्ष शिवीगाळ करीत मारहाण केल्याच्या निषेधार्थ पालिकेतील संतप्त अधिकार्यांसह कर्मचार्यांनी मंगळवारी दिवसभर कामबंद आंदोलन केले.
येथील पालिका कार्यालयात भाऊ सोनवणे, हरि काळे, बाळू काजळे, कपील पडूळ यांनी सर्व कर्मचार्यांसमक्ष अभियंता अक्षय इंदापुरकर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकाराने पालिकेतील कर्मचारी संतप्त झाले. यापूर्वी कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष शेख मोईन यांनाही याच पध्दतीने काही नगरसेवकांसह त्यांच्या नातेवाईकांनी शिवीगाळ करीत मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर या प्रकाराने संतप्त कर्मचार्यांनी दुपारपासून काम बंद आंदोलन केले व जिल्हा प्रशासनास निवेदन पाठवून या प्रकारात संबधितांविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


