परभणी (प्रतिनिधी) ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन व अश्विनी पौर्णिमेचे औचित्य साधून सुजाता नगर येथील सुजाता बुद्ध विहाराच्या प्रांगणात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २७ ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी ७.०० वाजता जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गौतम मुधावणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. तेलगोटे हे होते. या कार्यक्रमात बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात गौतम मुधावणे म्हणाले की, आश्विन पौर्णिमेला बौद्ध धम्मात विशेष महत्त्व असून या पौर्णिमेला वर्षावासाची समाप्ती होते. त्यानंतर बौद्ध भिक्खू चारही दिशांनी बुद्ध धर्माचा प्रचार_ प्रसार करण्यास सुरुवात करतात. ही केवळ बौद्ध भिक्खूंची जबाबदारी नसून आपलीही खूप मोठी जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
सुजाता नगर येथील निवृत्त कर्मचाऱ्यांनी एक संघ होऊन या नगरात भव्य दिव्य असे बुद्ध विहार निर्माण केलं आहे. विहाराच्या माध्यमातून येथील बौद्ध उपासक-उपासिका धम्माच कार्य मोठ्या जोमाने करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत जयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. आहे. बोलताना ते पुढे म्हणाले की, आजची तरुण पिढी ही आपल्या आई-वडिलांच्या जीवावर आरामात जीवन जगत आहे. त्यांना बऱ्याच गोष्टींची जाणीव होत नसून आपलं ध्येय लक्षात येत नाही. आजचे तरुण शिक्षणाच्या बाबतीत पाहिजे तेवढे अजूनही जागरूक दिसत नाहीत. या तरुणांनी निवृत्त कर्मचाऱ्यांचा आदर्श घेतला पाहिजे व जिद्दीने शिकून डॉक्टर इंजिनिअर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
आताची पिढी मोबाइल गेम, इंस्टाग्राम, फेसबूक, यातच वेळ घालवताना दिसते .या सर्वांनी या निवृत्त लोकांना बघून बोध घ्यावा या साठी ही आमची धडपड असल्याच ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प वाहण्यात आले तर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सुजाता महिला मंडळाने बुद्ध वंदना घेतली. निवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार झाल्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम झाला. सुर नवा ध्यास नवा चॅनेल फेम प्रशांत पाईकराव व संच यांनी एकरानंतर एक सुमधुर व बहारदार बुद्ध भीम गीते सादर केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बौद्ध उपासक उपाशीका हे मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन लबडे यांनी केले.
याप्रसंगी भगवान जगताप, गौतम मुंडे ,डी. आर. तूपसुंदर, अनिताताई सरोदे, एन. जी. गायकवाड, भीमराव वाघमारे, रोहित बनसोडे, रामराव तालेवार, अशोकराव जोंधळे, कैलास रगडे सर, प्रा .राम कांबळे, गौतम साळवे, पंडित प्रधान, अशोक गायकवाड, प्रवीण वाघमारे आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. स्नेह युवक मित्र मंडळाची पदाधिकारी व परिसरातील सर्व उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( छाया- संजय घनसावंत)
___. ___.____


