परभणी (प्रतिनिधी) सध्या परभणी जिल्हा आणि सर्व तालुक्यांमध्ये नापीक व दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मजूर वर्गाच्या हाताला काम मिळालेले नाही. यामुळे शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर तसेच इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कामगारांना दिलासा देण्यासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
पत्रातील पुढील प्रमाणे मागणी मान्यता आले आहे :
दिवाळी सणासाठी अर्थसहाय्य: परभणी जिल्हा व सर्व तालुक्यातील कामगार विभागामध्ये अधिकृत नोंदणी असलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येकी ५,०००/- रुपये आर्थिक मदत देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.
कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू करणे: मागील ६ महिन्यांपासून बांधकाम कामगारांच्या बंद असलेल्या कल्याणकारी योजना तात्काळ चालू करण्यात याव्यात.
प्रलंबित अर्जांची विल्हेवाट: जिल्ह्यातील प्रलंबित असलेले नवीन आणि नूतनीकरणाचे (Renewal) अर्ज तात्काळ निकाली काढावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या कामगारांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक या निवेदनाद्वारे दिली गेली आहे. या निवेदनावर संतोष धोत्रे अमोल तळपटे राजू शिरडकर राजू लिंबारे दत्ता चाफे नरेश एडके सुनील शिरोडकर प्रभाकर तळवटे भारत पवार प्रशांत पाशा चाँद पाशा आदींच्या स्वाक्षरी आहेत ( छाया संजय घनसावंत)


