परभणी,(प्रतिनिधी) :
येथील न्यू ज्योतिर्गमय इंग्लिश स्कुलमध्ये 4 ऑक्टोंबर रोजी शालेय धनुर्विद्या क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात प्रदुम्न निकम याने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धा इंडियन राउंड, रिकव्हर राउंड, कंपाउंड राउंड या प्रकारात झाल्या. स्पर्धेमध्ये 9 शाळांनी आपला सहभाग नोंदवला. स्कॉटीश अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्वच प्रकारांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रिया ठाकूर, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव एम. एम. क्षीरसागर यांच्यासह प्रशिक्षक महेश शिंदे, महानगरपालिकेचे क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जी जाधव हजार यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत आट्या पाट्या या खेळ प्रकारात मुले (वय गट 14) – आश्रमशाळा परभणी प्रथम, द्वितीय जिजाऊ ज्ञानतीर्थ, मुली (वय गट 14) माध्यमिक आश्रम शाळा दर्गा रोड प्रथम, मुले (वय गट 17) माध्यमिक आश्रम शाळा परभणी प्रथम, द्वितीय जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी, ज्योतिर्गमय इंग्लिश स्कुल तृतीय. मुली (वय गट 17) माध्यमिक आश्रमशाळा दर्गा रोड परभणी या शाळेचा संघ विजयी ठरला.
तसेच धनुर्विद्या स्पर्धेत (वय गट 17) इडियन राऊंड मुले (वय गट 17) प्रदुम्न निकम प्रथम, अर्जून वट्टमवार द्वितीय, ऋषीकेश देशमाने तृतीय, सुजांत साबळे चौथा, मुलीच्या गटात नक्षत्रा संदीप सरकटे पाटील प्रथम, अंशुता विनोद दुधगावकर द्वितीय, शर्वरी नितीन पवार तृतीय, दिव्या संदीप सोनी हीने चौथा क्रमांक पटकावला. (वय गट 14) मुले – सर्वेश बिपीन पेकम प्रथम, शिवराज नारायण दुधाटे द्वितीय, रितेश ज्ञानेश्रर मस्के तृतीय, आयुष उमाकांत लोखंडे चौथा. (वय गट 14) मुली – संस्कृती चंद्रशेखर गायकवाड प्रथम, धनश्री अतुल चाटे द्वितीय, तृतिय अनुष्का लक्ष्मीकांत सुर्यवंशी, (वय गट 19) अंतिम निकाल मुले – लक्ष्मीकांत मारोती देशमाने प्रथम, मुली – योगेश्वरी नरहरी कदम प्रथम, श्वेता नंदकुमार परदेशी हीने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचा निकाल जाहीर होताच खेळाडूंना प्रिया ठाकूर यांच्या हस्ते मेडल्सचे वाटप करण्यात आले.