परभणी ( प्रतिनिधी)महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या बी.एसस्सी. नर्सींग अभ्यासक्रम द्वितीय वर्ष परीक्षेचा काल निकाल जाहीर झाला असुन धनेश्र्वरी मानव विकास मंडळ संचालित परभणी नर्सिंग महाविद्यालयाचा डंका वाजला असून सलग दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत सर्व परीक्षार्थी विद्यार्थी यांनी घवघवीत यश संपादन केले.
परभणी नर्सिंग महाविद्यालय येथे २०२३ पासून वैद्यकीय क्षेत्रातील बी.एसस्सी. नर्सींग पदवी अभ्यासक्रमास सुरूवात झाली. या शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत उत्कृष्ट निकालाद्वारे स्वत:सह महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी बी.एसस्सी. नर्सींग द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रम परीक्षेतही यशाची उज्ज्वल पताका फडकविली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.वेदप्रकाश पाटील, आ.डॉ.राहुल पाटील, परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता तसेच संचालक डॉ.प्रमोद शिंदे, परभणी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य एस.आरती, आयशा नगमा, गायत्री वाघमारे, ऋषिकेश गायकवाड, नारायण पवार, क्षितिजा रोडे, प्रशासकीय अधिकारी विशाल आहेर, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


